वाघहल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत द्या!, भरपाईसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा का? विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला जाब Give Rs 50 lakhs to the families of those killed in the tiger attack! Why wait for months for compensation? MLA Sudhir Mungantiwar's reply to the government in the Assembly


🐅 वाघहल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत द्या!

🔶 भरपाईसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा का? विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला जाब

🔶 'निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम' पुन्हा सुरू करण्याची मागणी

🔶 गुंजेवाही दुर्घटनेनंतर प्रभावी उपाययोजनांवर भर

#Loktantra Ki Awaaz 
मुंबई, दि. २४ जुन : विदर्भात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांना वेळेत नुकसानभरपाई मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत प्रभावीपणे मांडला. २०२३ मध्ये कायदा करून ३० दिवसांत भरपाई देण्याची तरतूद असतानाही अनेक कुटुंबांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होताना आ. मुनगंटीवार यांनी वाघहल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना सध्या दिली जाणारी २५ लाख रुपयांची मदत वाढवून ५० लाख रुपये करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. तसेच तातडीने मदत मिळावी यासाठी पूर्वीची 'निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम' पुन्हा सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
👉🏻 गुंजेवाहीतील चार महिलांचा मृत्यू दुर्दैवी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गतवर्षीही याच परिसरात अशाच घटना घडल्या असूनही पुरेशी खबरदारी घेण्यात आली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
👉🏻 वर्षभरात ४० बळी; नागरिकांमध्ये अस्वस्थता
मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमुळे सुमारे ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शेती व जनावरांच्या नुकसानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळत नसल्याने ग्रामीण भागात असंतोष वाढत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
👉🏻 बचाव पथकांच्या मानधनाचाही प्रश्न
वन विभागाच्या प्राथमिक बचाव पथकांना अनेक ठिकाणी वर्षभर मानधन मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, अशा परिस्थितीत प्रभावी बचावकार्य कसे होणार, असा सवालही त्यांनी केला. वनमजूर, बचाव पथके आणि संवेदनशील भागांतील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
👉🏻 वनमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी वाघहल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना २४ तासांच्या आत १० लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाते, तर उर्वरित १५ लाख रुपये वारसदार निश्चित झाल्यानंतर वितरित केले जातात, असे स्पष्ट केले. काही प्रकरणांमध्ये वारसदारांच्या वादामुळे मदतीला विलंब होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
👉🏻 आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका
आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत वनमंत्र्यांनी नुकसानभरपाई प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासह 'निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम' राबविण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Give Rs 50 lakhs to the families of those killed in the tiger attack! Why wait for months for compensation? MLA Sudhir Mungantiwar's reply to the government in the Assembly 

#GiveRs50lakhstothefamiliesOfthosekilledinthetigerattack
#WhywaitformonthsforcompensationMLASudhirMungantiwar'sreplytothegovernmentintheAssembly
#MLASudhirMungantiwar 
#KilledInTigerAttack 
#Tiger