विदर्भ पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था मर्यादित, नागपूर, विशेष सभा व नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड २०२६ Vidarbha Irrigation Employees Credit Society Limited, Nagpur, Special Meeting and Unopposed Election of New Executive Committee 2026

🔶 विदर्भ पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था मर्यादित, नागपूर

🔶 विशेष सभा व नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड २०२६

#Loktantra Ki Awaaz 
नागपूर: विदर्भ पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था मर्यादित, नागपूर मध्ये कार्यरत असलेले सचिव आणि अध्यक्ष सेवानिवृत्त झाल्याने तसेच उपाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे, रिक्त झालेल्या पदांसाठी शनिवार, दिनांक ०७ नवंबर रोजी नागपूर येथील 'विदर्भ सेलिब्रेशन हॉल' मध्ये एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभा व निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक भारत कासारे व पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अत्यंत कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने पार पडली.

या सभेमध्ये संस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव या मुख्य पदांची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने व एकमताने खालीलप्रमाणे मुख्य पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
• अध्यक्ष: कु. मेघा करारे
• उपाध्यक्ष: इंजि. मोनिका कायरकर
• मानद सचिव: सुरेशगीर ज. रिधनार्थी
नूतन कार्यकारिणी व इतर महत्त्वाच्या नियुक्त्या:
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर, नवनियुक्त मानद सचिव सुरेशगीर रिधानार्थी यांनी सर्वानुमते इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जाहीर केल्या. यामध्ये सहसचिव म्हणून राजेंद्र देशमुख, संचालक  अविनाश हर्षे यांची कोषाध्यक्ष पदी, तर मुकेश खराबे यांची पालक संचालक (सिंचन शाखा, नागपूर) म्हणून सर्वानुमते घोषणा करण्यात आली.

तसेच, संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी नितीन कहले हे आधीपासूनच उत्तम रितीने पदावर कार्यरत असल्याने, पुढे सुद्धा त्यांनीच ही जबाबदारी अविरतपणे पार पाडावी, असे सर्व संचालकांनी एकमताने ठरविले.

मान्यवरांची उपस्थिती:
या प्रसंगी मा. सहाय्यक निबंधक भारत कासारे व पाटील यांच्यासह संस्थेचे सन्माननीय संचालक व पालक संचालक श्याम वैद्य, सतीश भोयर, माधव वडनेरकर, गणेश गेडेकर, चंद्रशेखर चापले, विजित थूल, तसेच स्वीकृत संचालक नितीन सोमकुवार, सौ. रंजना चौरागडे आणि संस्थेचे सर व्यवस्थापक विशाल भोतमंगे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.