मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा सविस्तर आढावा

औरंगाबाद 8 मार्च (का. प्र.):
अपूर्ण सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची टंचाई असते.  मराठवाड्यातील पाण्याची आवश्यकता पाहता अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी आज औरंगाबाद येथे अधिकाऱ्यांना दिल्या.

जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पा‍टबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री जयंत पाटील बोलत होते.