जालना जिल्ह्यातील कंडारी सारख्या छोटयाशा गावातील हे आरोग्यसेवेतील दांपत्य पुणे येथे थेट कोरोना रूग्णांना रुग्णसेवा


लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क ,
आनंद पारख द्वारा
जालना / बदनापूर, दि. 12 अप्रैल : कोरोना विषणूमुळे सर्व जगात हाहांकार माजलेला असताना महाराष्ट्रातील पोलिस, आरोग्य सेवक व प्रशासकीय यंत्रणा संयुक्तपणे लढा देत या विषाणूला थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील आरोग्य सेवेत असलेले ढाकणे दांपत्य या परिस्थितीतही तीन वर्षाच्या मुलाला औरंगाबाद येथे आजी कडे ठेऊन व  वडिलांना ह्रदयरोगाचा त्रास  असल्यामुळे ह्रदयावर शस्त्रक्रिया केलेली असता नाही. मागील दीड महिन्यांपासून कडारी येथिल दांपत्य पुणे येथे कोरोना  या आजाराने आजारी असणाऱ्यांना रुग्ण सेवा बजावत आहेत.

कोरोना रोगाचा फैलाव रोखण्यासाठी शासन विविध प्रयत्न करत असून लॉकडाऊनची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतात कोरोनाला मात करण्यासाठी पोलिस, प्रशासकीय यंत्रणा काम करत असतानाच आरोग्य सेवक व डॉक्टरही दिवसरात्र रूग्णसेवा करून हा रोग हटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. असेच एक उदाहरण बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द या छोटयाशा गावातून दिसून येत आहे. कंडारी येथे मागील 20 वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असलेले जगन्नाथ ढाकणे यांचा मुलगा रामप्रसाद ढाकणे व सून दिपाली ढाकणे हे आरोग्यसेवेत पुणे येथे आहेत. रामप्रसाद हे पुणे येथील वेलस्प्रिंग रूग्णालयात आरोग्य सेवा बजावतात तर त्यांची पत्नी दिपाली या पिंपरी चिंचवड येथील  वायसीएम रुग्णालयात आरोग्य सेवेत आहेत. दीड महिन्यापूर्वीच जेव्हा पुणे येथे पहिला कोरोना रूग्ण सापडला तेव्हापासून ते केारोना रूग्ण सेवेत रुजू झालेल्या आहेत. कंडारी येथे जगन्नाथ ढाकणे यांना ह्रदयरोग असल्यामुळे ह्रदयावर शस्त्रक्रिया केलेली असता नाही या दांपत्याने आपला तीन वर्ष वयाच्या कैवल्य नावाच्या मुलाला आजोळी औरंगाबाद  येथे आजी  ठेवून पुणे गाठून रूग्णसेवेस सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळात पिंपरी चिंचवड भागातच सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण होते. परंतु ढाकणे दांपत्यासारख्या असंख्य आरोग्यसेवकांमुळेच येथील रुग्णसंख्या घटलेली आहे. ज्यावेळेस तेथे रूग्ण वाढ होत होती तेव्हा मुंबई- पुणे व तत्सम शहरातून कोरोनाच्या भितीमुळे सर्वसामान्य नागरिक गावाकडे जात असताना कंडारी सारख्या छोटयाशा गावातील हे आरोग्यसेवेतील दांपत्य पुणे येथे थेट कोरोना रूग्णांना रुग्णसेवा देत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.