ऑक्शन एड संस्था संस्थेच्या माध्यमातून गाव गाव साबण वाटप करण्यात आल्या


जालना / बदनापुर ,16 मई (प्रतिनिधि): 
 ऑक्शन एड संस्था संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.  ऑक्शन एड संस्था जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील १० गावमध्ये शेती, रोजगार, पाणी, महिला सक्षमीकरण, बचत गट स्थापन करणे, आरोग्य, शिक्षण अशा प्रकारे काम करत असते.सध्या जगात कोरोना व्हायरस कोविड १९ यामुळे अनेक ककुटुंबाच्या  हाताला काम नाही. घराबाहेर पडता येईना.  स्वतःची स्वच्छता राखावी या हेतुने ऑक्शन एड संस्था संस्थेच्या माध्यमातून सागरवाडी, पिरवाडी, ढासला, खामगाव, परदेशी वाडी, कंडारी, सिरसगाव घाटी, खडकवाडी या गावामध्ये जाऊन घरोघरी अक्शन एड संस्थेच्या माध्यमातून संतुरु साबण वाटप करण्यात आल्या आहेत.  संस्थेचा मुख्य हेतू प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे.
वेळोवेळी प्रत्येकाने हात स्वच्छ धुणे जेणेकरून कोरोना व्हायरस आपल्या जवळ येणार नाही.

यावेळी वाटपा करताना बदनापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी हरकल  साहेब अक्शन एड संस्थेचे भागवत वाघमारे, गब्बरसिंग बहुरे, संदिप शिंदे, गावसाथी प्या राजबाई भागचंद कवाळे,  सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल, माजी उपसरपंच देवचंद बहुरे, उपसरपंच केसरसिंग बहुरे, अंबरसिंग बहुरे, मंनुसिंग बहुरें ,अजय खोकड,राजू वैष्णव , भागचंद कवाले आदी सर्व उपस्थित होते.