कोरोणा जागतिक महामारी विरोधात "आदर्श मास्क बँक " ची महत्वपूर्ण भूमिका - सतीश धोटे, राष्ट्रीय हरित सेना व भारत स्कॉऊट-गाईड यूनिट तर्फे मास्क चे वितरण। , " आदर्श मास्क बँक " च्या माध्यमातून मास्क चे संकलन व वितरण

लोकतंत्र की आवाज़,चंद्रपूर
राजुरा ,22 मई (का.प्र): बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर ,राजुरा येथील भारत  स्कॉऊट-गाईड विभाग व आदर्श हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेना विभागांच्या संयुक्त विद्यमानाने "आदर्श मास्क बँकेच्या " उपक्रमाचे  उद्घाटन करण्यात आले. यावेळी सतीश धोटे, अध्यक्ष ,बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा,
विजय परचाके , गटशिक्षणाधीकारी ,पं.स. राजुरा 
प्रा. बी यू. बोर्डेवार ,अध्यक्ष, राजुरा तालुका पत्रकार संघ , बाळ सराफ, सचिव , ऐजाज अहमद  , अध्यक्ष ,राजुरा तालुका प्रेस असोसिएशन राजुरा ,
श्रीकृष्ण गोरे ,सचिव , नलीनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर ,सारीपुत्र जांभूळकर ,मुख्याध्यापक ,आदर्श हायस्कूल ,यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. संपूर्ण जगात कोविड -19 या विषाणूंचा हैदोस माजला आहे. कोरोणा सारख्या माहामारीवर नेमका केव्हा अंकुश लागेल हे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. घरी राहा -सुरक्षित राहा असे आवाहन सरकार, प्रशासना मार्फत  करण्यात आले आहे. कोरोणा पासून बचाव करण्याकरीता अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवीन्यात येत आहे. त्यात आदर्श शाळेच्या "आदर्श मास्क बँक " ची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे.असे प्रतिपादन सतीश धोटे यांनी केले.या मास्क बँकेत शाळेतील विध्यार्थीचे पालक ,शिक्षकवर्ग ,स्कॉऊट-गाईड ,राष्ट्रीय हरित सेना आणि इतरही समाजसेवक यांच्या मार्फत तयार केलेले मास्क जमा केले जात आहे. आणि या मास्क बँकेच्या माध्यमातून गरजूना मोफत  मास्क दिल्या जात आहे.या उपक्रमाचे उद्घाटन  यावेळी करण्यात आले. पत्रकार हे तळागळातिल सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत असतात. नागरिकांना येणाऱ्या समस्या पुढे आणून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्या संधर्भात शासन -प्रशासन स्थरावर पाठपुरावा करीत असतात. त्यामुळे पत्रकाराच्या माध्यमातून गरजू पर्यंत हे मास्क पोहचवावे याकरीता या उपक्रमाची सुरुवातिला राजुरा येथील पत्रकार संघांना मास्क देण्यात आले.व त्यांच्या मार्फतीने गरजू व्यक्ति पर्यंत हे मास्क पोहचवले जातील. पुढे या माध्यमातून आणखी नागरिकांना विविध विभागांच्या माध्यमातून या बँकेतिल मास्क पुरवले जाणार असून त्यांच्या कडून गरजू नागरिकांना हे मास्क मोफत दिले जातील. या उपक्रमाला यशस्वी करण्याकरीता चंद्रपुर जिल्हा भारत स्कॉऊट-गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक  यशवंत हजारे व राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले ,आदर्श शाळेच्या सहाय्यक शिक्षिका वैशाली चीमुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार बादल बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता छ. शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट चे रुपेश चिड़े ,जिजामाता गाईड यूनिट च्या सुनीता कोरडे , अर्चणा मारोटकर ,रोशनी कांबले तसेच  विध्यार्थी ,पालकवर्गाचे सहकार्य लाभले.