वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून तीन बहीनींचा दुर्दैवी मृत्यू
प्रतिमा व कविता मंडळ चा मृतदेह सापडले
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गा सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहीनींचा बुडुन मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना १.३० वाजताच्या सुमारास घडली असल्याचे समजते.चंद्रपूरातील बाबुपेठ परीसरातील रहीवाशी असलेले मंडल कुटुंबीयावर शोककळा पसरलीआहे. चंद्रपूर पोलिसांनी शोध मोहीम राबवित कविता व प्रतिमा या दोघी बहिणीचा मृतदेह सायंकाळी वृत लिहिपर्यंत शोधून काढला होता.
चंद्रपूर येथील मंडळ परिवारातीलसदस्य महाशिवरात्री निमित्ताने चंद्रपूर व गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीवरील नदी पात्रात आंघोळीसाठी वैनगंगा नदीच्या पुलाखाली गेले होते. आंघोळ करीत असताना प्रथमेश पाण्याचा अंदाज न आल्याने डुबकी मारत असल्याचे दिसून आले.भावाला वाचविण्यासाठी तीन सख्या बहीणी पाण्यात उतरल्या .यात आंघोळीसाठी गेलेल्या प्रतीमा प्रकाश मंडल २३, कविता प्रकाश मंडल २२, लीपीका प्रकाश मंडल १८ यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात शीरल्या. सोबत त्यांचा लहान भाऊ व काकु सुध्दा होती. हे पाचही जण बुडत असताना आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत बराच कालावधी लोटला. दरम्यान सोबत असलेल्या काकाने प्रसंगावधान राखुन एका लहान मुलाला बाहेर काढुन तात्काळ प्राथमिक उपचार केल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश मीळाले. तर सोबत असलेली महीला पाण्याच्या प्रवाहाने वाहात जातांना नदीतील दगडाचा आधार घेऊन तब्बल एक तास पर्यंत ती तीथेच होती. तालुक्यातील आपदा दलाच्या मदतीने संबंधीत महीलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
Unfortunate death of three sisters after drowning in Wainganga river, bodies of Pratima and Kavita Mandal found