चंद्रपुर जिल्ह्य बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण( इंस्टीटूअशनल कोरंटिन ) बंधनकारक -जिलाधिकारी डॉ कुणाल खेमनार, आरोग्य विषयक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1921 / 1075 डायल करा


     एकूण बाधीतांची संख्या 43

     आतापर्यंत 23 बाधितांना सुटी

    ॲक्टिव बाधीतांची संख्या 20

     सध्या 9 कंटेनमेंट झोन कार्यरत

     आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा

    आरोग्यविषयक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1921 / 1075  डायल करा

चंद्रपूर, दि.11 जून (जिमाका) : परराज्यातून, पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून नोंद करावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक असणार आहे. स्वत:च्या कुटूंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी आपली माहिती लपवू नका, नागरिकांनी देखील प्रशासनाला माहिती द्यावी, आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 43 झाली आहे. यापैकी, आतापर्यंत 23 कोरोना बाधीत  कोरोना  मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे.सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दोन कोरोना बाधित व 18 कोरोना बाधीत कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव बाधीतांची संख्या 20 असुन या  रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यात एकूण 21 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 9 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 21 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 48 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी  45 नमुने निगेटिव्ह तर 3 नमुने प्रतीक्षेत आहेत.

कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण:
सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 43 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1, हैद्राबाद-1, मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1,  प्रवासाचा कोणताही प्रकारचा
इतिहास नसलेले-3, संपर्कातील व्यक्ती - 10 आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यामध्ये 1 हजार 946 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 43 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 718 नमुने निगेटिव्ह, 167 नमुने प्रतीक्षेत तर अनिर्नयीत 18 आहेत.

अशी आहे जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:
दिनांक 11 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 166 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 485 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.तालुकास्तरावर 405 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तर, जिल्हास्तरावर 276 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत परराज्यातून,जिल्ह्यातून 76 हजार 978 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 72 हजार 169 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 4 हजार 809 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 
13 मे ( एक बाधीत), 
20 मे ( एकूण 10 बाधीत ), 
23 मे ( एकूण 7 बाधीत),
24 मे ( एकूण 2  बाधीत), 
25 मे ( एक बाधीत ), 
31 मे ( एक बाधीत ), 
2 जून (एक बाधीत),
 4 जून ( दोन बाधीत), 
5 जून ( एक बाधीत),
6 जून ( एक बाधीत), 
7 जून ( 11 बाधीत),
9 जून ( एकुण 3 बाधीत),
10 जून ( एकुण 1 बाधीत),

अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 43 झाले आहेत. आतापर्यत 23 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 43 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 20 आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी नोंदणी व आरोग्य तपासणी करावी :

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन येथे नोंद व तपासणी करावी. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याचे ठिकाणी बस स्टॅन्ड परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा:

कोरोनाशी संबंधित माहिती, आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषयीची जोखीम कितपत आहे. यासाठी आरोग्य सेतू ॲप नागरिकांनी डाऊनलोड करावे. तसेच टोल फ्री क्रमांक 1921 किंवा 1075 यावर सुद्धा आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे.नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.