चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील जवाहर नगर येथील वीस वर्षीय युवक कोरोना पॉजिटिव , आतापर्यतची बाधित संख्या ९६, चंद्रपूर जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ४२


चंद्रपूर जिल्हयातील राजुरा
शहरात एक पॉझिटीव्ह 

चंद्रपूर , 30 जुन (जिला माहिती कार्यालय, चंद्रपूर):
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ३० जून रोजी आणखी एक बाधित आढळून आला आहे. जिल्ह्यातील राजुरा शहरातील जवाहर नगर येथील वीस वर्षीय युवक औरंगाबाद येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. २९ जून रोजी या युवकाचा स्वॅब घेण्यात आला. ३० जून रोजी नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव रुग्णाची संख्या ९६ झाली आहे. मात्र आतापर्यंत ५४ नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या इलाज घेत असलेले सर्व ४२ बाधित वैद्यकीय दृष्ट्या स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.       
       जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत 
२ मे ( एक बाधित )
१३ मे ( एक बाधित)
 २० मे ( एकूण १० बाधित )
 २३ मे ( एकूण ७ बाधित ) 
 २४ मे ( एकूण बाधित २ ) 
२५ मे ( एक बाधित ) 
३१ मे ( एक बाधित )
२ जून ( एक बाधित )
४ जून ( दोन बाधित )
५ जून ( एक बाधित ) 
६ जून ( एक बाधित )
७ जून ( एकूण ११ बाधित ) 
९ जून ( एकूण ३ बाधित )
 १०जून ( एक बाधित )
 १३ जून ( एक बाधित ) 
१४ जून ( एकूण ३ बाधित )
 १५ जून ( एक बाधित ) 
१६ जून ( एकूण ५ बाधित 
 १७ जून ( एक बाधित )
 १८ जून ( एक बाधित )
२१ जून ( एक बाधित ) 
२२ जून ( एक बाधित ) 
२३ जून ( एकूण ४ बाधित ) 
२४ जून ( एक बाधित ) 
२५ जून ( एकूण १० बाधित ) 
२६ जून ( एकूण २ बाधित )
 २७ जून ( एकूण ७ बाधित )
 २८ जून ( एकूण ६ बाधित ) 
२९ जून ( एकूण ८ बाधित ) आणि 
३० जून ( एक बाधित )

अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ९६ झाले आहेत. आतापर्यत ५४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. 
त्यामुळे ९६ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४२  झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.