पालकमंत्री विजय वडेटटीवार महोदयाला महापौरांनी केली विशेष निधीची मांगणी

चंद्रपुर , 02 जून (का प्र) : संपूर्ण देशात कोरोना (कोविड - १९) विषाणूचा प्रादुर्भाव सुरु असल्याने राज्यात संचारबंदी व जमावबंदी सुरु असल्यामुळे शहराच्या विकासात्मक कामात अडथळा निर्माण झाला आहे. आज दिनांक ०२ जून, २०२० रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन रु  १०.०० कोटी निधीची मागणी व शहराच्या विकासात गती मिळण्याचे उद्देशाने डी.पी.डी.सी. अंतर्गत मिळणारी निधीची मागणी केली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू  असल्यामुळे  मनपाच्या मालमत्ता कर व इतर कराची वसुली हि कमी झाल्याने शहराच्या विकास कामांची  गती  मंदावली आहे . त्या विकास कामाला रोक लागल्याने तेही काम करणे महत्त्वाचे आहे. म्हणून  मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेता या करिता रु. १०.०० कोटी विशेष निधी देण्यात यावी. तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी   डी.पी.डी.सी.   अंतर्गत मिळालेल्या निधी पैकी या वर्षी या योजनेतून जास्त निधी देण्यात यावी अशी मागणी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी पालकमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे. या आधी ही माजी. कॅबिनेट मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे पालकमंत्री असतांना शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भरपूर निधी आणून दिल्याने शहराच्या विकासाची कामे जोमात होत गेली. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये ती विकासाची गती मंदावली आहे. त्याकरिता या पुढे हि शहराच्या विकासाचा वेग वाढविण्या करिता विशेष निधी मा. पालकमंत्र्यांनी महानगरपालिकेला मिळवून द्यावा. अशी शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने विनंती केली आहे.  याप्रसंगी मा. आमदार श्री किशोर जोरगेवार, आयुक्त, श्री राजेश मोहिते मनपाचे सभागृहनेता श्री वसंत देशमुख, विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर तसेच नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.