सिंदेवाही तालुका 6 , गडचांदूर 3, चिमूर तालुका 3, बल्लारपूर शहर 2, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 421, 261 कोरोनातून बरे ; 160 वर उपचार सुरु

सिंदेवाही तालुका 6 , गडचांदूर 3, चिमूर तालुका 3, बल्लारपूर शहर 2, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 3

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 421

261 कोरोनातून बरे ; 160 वर उपचार सुरु

चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत. 

     आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ )  गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर शहर ( २ ) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील (३ ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण १८ बाधित पुढे आले आहेत.

       त्यामुळे कालपर्यंत ४०३असणारी बाधितांची संख्या आज ४२१ झाली आहे.