नागपूर धक्कादायक कोरोना बातमी: नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

नागपूर धक्कादायक कोरोना बातमी:  नागपुर   महानगरपालिकेचे आयुक्त   तुकाराम मुंढेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

नागपूर, 25 ऑगस्ट (प्रतिनिधि) : नागपूरमध्ये कोरोनाने उद्रेक मांडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या परिस्थितीशी पालिका प्रशासन लढा देत आहे. परंतु, कोरोनाशी लढा देत असताना नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
तसंच, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी स्वत: ला होमक्वारंटाइन करून घेतले आहे. शासनाने जे नियम घालून दिले आहे, त्याचे पालन करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर गेल्या 14 दिवसांमध्ये माझ्या संपर्कात जे कुणी आले असेल त्यांनी समोर यावे आणि माहिती द्यावी. लगेच कोरोनाची चाचणीही करून घ्यावी, असं आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले.

तुकाराम मुंढे हे होम क्वारांटाइन झाले आहे. घरातूनच ते नागपुर शहरातील कोरोनाची परिस्थितीवर काम करणार आहे.