चंद्रपूर जिल्ह्यात आज 222 नवीन कोरोना बधित , एकूण बाधित 3167 , एकूण मृत्यु 31 #Corona #चंद्रपूर #कोविड-19

चंद्रपूर,03 सेप्टेंबर(का प्र) :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 3167 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 222 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1476 बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 1656 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1476 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील 35 सह एकूण 31 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिला मृत्यु : आझाद चौक , तुकुम चंद्रपूर येथील 67 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 28 ऑगस्टला पॅईंग क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 2 सप्टेंबरला पंईंग क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे . 

दुसरा मृत्यु : 48 वर्षीय भानापेठ वार्ड चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 27 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 2 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता . 

तिसरा मृत्यू : 52 वर्षीय रहमत नगर चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 20 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते . बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता . आज 3 सप्टेंबरला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . 
( गेल्या 24 तासातील है तीन मृत्यु आहेत )