पहिला मृत्यू : सरकार नगर , चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : मंजुषा लेआउट परिसर , भद्रावती येथील 61 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : राजुरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील वरील तीन मृत्यू आहेत . अनुक्रमे पहिल्या बाधिताला कोरोनासह मधुमेह , दुसऱ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व उच्च रक्तदाब तर तिसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने या तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 152 ( चंद्रपूर 143 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01)