चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 कोरोना बाधिताचा मृत्यु #Covid-19

चंद्रपूर, 07 सेप्टेंबर (का प्र): 
पहीला मृत्युः गोपालपुरा , बालाजी वार्ड चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे.या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

 दुसरा मृत्यु : 54 वर्षीय बिनबा वॉर्ड , चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 4 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 6 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता . ( गेल्या 24 तासातील हे दोन मृत्यु आहेत )