आज गुरुवारी चंद्रपूर महानगरतील 3 कोरोना बधितान चा मृत्यु, एकूण जिल्ह्यात मृत्यु संख्या 52 corona

चंद्रपूर, 10 सेप्टेंबर (का प्र):
पहिला मृत्युः अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 दुसरा मृत्युः तुकुम चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 6 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .9 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

 तिसरा मृत्यु : नगीना बाग चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 56 ( चंद्रपूर 52 , तैलंगाणा 01 , बुलडाणा 01 आणि गडचिरोली 2 )

( गेल्या 24 तासातील है तीन मृत्यु आहेत )