चंद्रपूर जिल्ह्यात आज 5 कोरोना बधितनचा मृत्यु, एकूण संख्या 66 (60 चंद्रपूर जिल्ह्यातील) #CoronaDeathChandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात आज 5 कोरोना बधितनचा मृत्यु,

एकूण संख्या 66 (60 चंद्रपूर जिल्ह्यातील)

चंद्रपूर, 12 सेप्टेंबर (का प्र):
पहिला मृत्यु : अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

दुसरा मृत्यु : वणी , यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

तिसरा मृत्युः झरी बामणी यवतमाळ येथील 48 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 चवथा मृत्यु : घुटकाळा तलाव चंद्रपूर येथील 54 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 8 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 11 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता .

 पाचवा मृत्युः जटपुरा गेट , चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 ( गेल्या 24 तासातील हे पाच मृत्यु आहेत )

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 66 ( चंद्रपूर 60 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 02 ).