बल्लारपुर येथील शिक्षक विनायकराव माकोड़े यांचे दुःखद निधन

चंद्रपूर/बल्लारपुर , 20 सेप्टेंबर : बल्लारपूर येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर चे सेवा निवृत्त शिक्षक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले नावलौकिक गाजवत आहे.

 असे अनेक विद्यार्थी घडविणारे माजी सेवानिवृत्त झालेले शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे श्री विनायकराव मोकोडे वय - 80 वर्ष यांचे आजारामुळे निधन झाले आहे.

 त्यांच्या पश्चात 4 मुलं व 1 मुलगी व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे माजी नगराध्यक्ष स्व. पुंडलीकरावजी माकोडे यांचे बंधू तर माजी नगराध्यक्ष श्री दिलीप माकोडे व नगरसेवक श्री भास्कर माकोडे यांचे काका होते.

 स्व. विनायकराव माकोडे यांच्या निधनानंतर त्यांचेवर चंद्रपूर येथे उद्या 21 सप्टेंबर ला सकाळी 11:00 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

(साभार-मनोहर दोतपल्ली)