चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन, २५ सप्टेंबर २०२० पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम #ChandrapurPolice #ChandrapurTrafficPolice #Chandrapur

चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन,

 २५ सप्टेंबर २०२० पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम

चंद्रपूर 20 सेप्टेंबर (का प्र) : चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन दिनांक २५ सप्टेंबर  २०२० पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा . श्री अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमनासाठी , शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे , त्याच बरोबर अवैध वाहन चालकांवर नियंत्रण राहावे , सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपध्दती पाळण्यावर भर देण्यासाठी तसेच वाहन चोरी व तत्सम गुन्हयांवर अंकुश लावण्याकरीता पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुक नियंत्रण शाखेसह शहर पोलीसांच्या संयुक्तविद्यमाने शुकवार दिनांक २५ सप्टेंबर , २०२० पासुन चंद्रपूर शहरात वाहन तपासणी मोहीम सुरु होणार आहे . सदर वाहन तपासणी मोहिमे दरम्यान दुचाकीसह चारचाकी वाहन चालक यांच्याकडील वाहन चालन परवान्याची वैद्यता व वाहनांचे आवश्यक कागदपत्राची , वाहन चालवितांना मोबाईलचा वापर , नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही , कर्णकर्कश हॉर्न आदी गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे . या तपासणी मध्ये विशेषतः वाहनांचे कमांक , वाहनांचे कागदपत्र यावर जास्त भर देण्यात येणार असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे . करीता , पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे यांचे कडुन शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की , सर्व वाहन धारक यांनी वाहन चालवितांना सोबत वाहन चालविण्याबाबत सर्व आवश्यक कादगपत्रे सोबत बाळगुन पोलीस ठाणे चंद्रपूर शहर , पोलीस ठाणे रामनगर व पोलीस ठाणे दुर्गापूर सह शहर वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाहन तपासणी मोहिमे दरम्यान योग्य सहकार्य करावे .