मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 03 कोरोना बाधितांचा मृत्यु ,एकूण मृत्यु 187 (जिल्ह्यातील 178) Corona

चंद्रपूर, 12 ऑक्टोबर :
पहिला मृत्यू : संतोषी माता वार्ड , बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 4 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

दुसरा मृत्यू : बाबुपेठ , चंद्रपुर येथील 56 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 तिसरा मृत्यू : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परीसर , चंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 4 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील हे वरील तीन मृत्यू आहेत . तीनही बाधितांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 187 ( चंद्रपूर 178 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01 )