हॉटेल ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी अनिवार्य; हॉटेल मध्ये शाकाहारी-मांसाहारीसाठी स्वतंत्र किचन – FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची हॉटेल व्यावसायिकांना कडक नियमावली Free drinking water mandatory for hotel customers; Separate kitchen for vegetarians and non-vegetarians in hotels – FDA Commissioner Tukaram Mundhe's strict guidelines for hoteliers

🫗 हॉटेल ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी अनिवार्य;

🍽️ हॉटेल मध्ये शाकाहारी-मांसाहारीसाठी स्वतंत्र किचन – FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची हॉटेल व्यावसायिकांना कडक नियमावली
 
#Loktantra Ki Awaaz 
मुंबई, 25 जून : महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे, कॅन्टीन, क्लाऊड किचन, स्वीट मार्ट, बेकरी आणि सर्व खाद्य व्यवसायांसाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (24 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि अधिकृत आदेशाद्वारे कठोर नियमावली जाहीर केली. ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे प्रत्येक खाद्य व्यवसायाची कायदेशीर व सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुंढे यांनी सांगितले की, राज्यभरातील तपासण्यांमध्ये अस्वच्छ स्वयंपाकघर, वापरलेले तेल पुन्हा वापरणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नसणे, तापमान नियंत्रणातील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाच्या पॅकिंग साहित्याचा वापर अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

👉🏻 महत्त्वाचे नवे नियम
🔹ग्राहकांना मोफत व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक.

🔹शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन) किंवा पूर्णपणे वेगळी प्रक्रिया ठेवणे.

🔹वैध FSSAI परवाना/नोंदणी आस्थापनात ठळकपणे प्रदर्शित करणे.

🔹स्वयंपाकघर व परिसरात उच्च दर्जाची स्वच्छता राखणे.

🔹अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षण.

🔹काळे किंवा वारंवार वापरलेले खाद्यतेल वापरण्यास बंदी; वापरलेल्या तेलाच्या विल्हेवाटीसाठी FSSAI च्या RUCO मार्गदर्शक तत्त्वांचे पालन.

🔹वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्न देण्यास किंवा पॅक करण्यास मनाई.

परवानाधारक पुरवठादारांकडूनच कच्चा माल खरेदी करणे.

🔹मोठ्या हॉटेल्स व चेन रेस्टॉरंटमध्ये मेनूवर कॅलरी, पोषणमूल्य व अॅलर्जनची माहिती देणे.

🔹वार्षिक उलाढाल 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या खाद्य व्यवसायांसाठी वार्षिक अन्न सुरक्षा लेखापरीक्षण (Audit) अनिवार्य. 

पत्रकार परिषदेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्य व्यवसायांवर दंड, फौजदारी कारवाई तसेच परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी कोणालाही खेळू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Free drinking water mandatory for hotel customers; Separate kitchen for vegetarians and non-vegetarians in hotels – FDA Commissioner Tukaram Mundhe's strict guidelines for hoteliers 

#FreeDrinkingWaterMandatoryForHotelCustomers 
#Separatekitchenforvegetariansandnon-vegetariansInHotelsFDA #CommissionerTukaramMundhe's #strictGuidelinesforhoteliers 
#FDA 
#TukaramMundhe 
#HotelDrinkingWater