चंद्रपूर ,07 ऑक्टोबर : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे. या विषाणुचे लोन शहरात व ग्रामीण भागात पसरले आहे. चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दिवसाला २ पेक्षा जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. मृत्यूची संख्या वाढत जात असल्याने मृतांच्या अंत्यसंस्कार विधीकरीता असलेल्या स्मशानभुमीत व्यवस्था अपुरी पडत आहे. अशा परीस्थितीत बरेचदा अंत्यविधी पार पाडायला अडचण होते, विलंब होतो. कोरोणा बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे व कोरोणा विषाणूमुळे मृत झालेल्यांच्या अंत्यविधीत घ्यावी लागणारी विशेष काळजी तथा ऊपाययोजना याचा नातेवाइकांसह प्रशासनाला देखील अपू-या व्यवस्थेमुळे अडचण होत आहे. प्रशासनासमोर बरेचदा या आपात्कालीन परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रश्न पडतो. अनेकदा अंत्यसंस्काराला विलंब होत असल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात विद्युत / एल. पी. जी. शवदाहिनी लावण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. यामध्ये उपचार घेत असताना कोरोना बाधितांच्या मृत्यू देखील होत आहे. यामध्ये मृत्यू होणाऱ्या बाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महानगर पालिका प्रशासनातर्फे या मृत्यू पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे विद्युत / एल. पी. जी. शवदाहिनी शहरात लावल्यामुळे अंत्यविधी करतांना उत्पन्न होणारे अनेक प्रश्न सुटणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शवदाहिनी लावण्यात आल्या आहे. चंद्रपुर वाढत्या लोकसंख्येचे शहर असल्याने याचा फायदा कोरोणा आपात्कालीन काळात व ईतर वेळीही होणार आहे. माणसाच्या मरनोपरांत त्याच्या देहाची विटंबना होवू नये, नातेवाईक व प्रशासनाला त्रास होवू नये, असे खासदार बालुभाऊ धानोरकर यांनी म्हटले आहे.