चंद्रपुर जिल्ह्यात 48 तासात 5 मृत्यू ; 162 नवीन बाधित corona

दोन दिवसात 283 बाधितांची कोरोनावर मात

48 तासात 5 मृत्यू ; 162 नवीन बाधित

 आतापर्यंत 15133 बाधित झाले बरे

 उपचार घेत असलेले बाधित 2242

 एकूण बाधितांची संख्या 17646

चंद्रपूर, दि. १५ नोव्हेंबर : चंद्रपुर जिल्ह्यात शनिवारी १६२ व रविवारी १२१  असे मागील दोन दिवसात २८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

तसेच गत 48 तासात जिल्ह्यात एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून पहिल्या 24 तासात 2 जण तर दुसऱ्या 24 तासात 3 कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

 तसेच दोन्ही दिवसात जिल्ह्यात एकूण १६२ जण (काल १०१ व आज ६१) नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

शनिवारी मृत झालेल्यांमध्ये राजूरा येथील ५० वर्षीय पुरूष,  

आलापल्ली गडचिरोली  येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

तर रविवारी  गडचिरोली जिल्ह्यातील मुलखेड सुंदर नगर येथील 80 वर्षीय पुरुष, वार्ड नंबर सहा गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष आणि बंगाराम तळोधी ता. गोंडपिंपरी चंद्रपूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत २७२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५३, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १०, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ६४६ वर पोहोचली आहे. 

तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १५ हजार १३३ झाली आहे. 

सध्या २ हजार २४२ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार ३६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख अकरा हजार ४३३ अहवाल निगेटीव्ह आले आहे.

कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित व्हावी यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. बाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी सदैव मास्कचा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.