चंद्रपुर जिल्ह्यात दुचाकी वाहनाकरिता नवीन मालिका सुरु Chandrapur RTO 2 Wheeler New Series

चंद्रपुर जिल्ह्यात दुचाकी वाहनाकरिता नवीन मालिका सुरु

चंद्रपूर दि. २७ फेब्रूवारी: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे दुचाकी वाहनाकरिता एम.एच. ३४ बी.व्ही.-०००१ ते एम.एच. ३४ बी.व्ही.-९९९९ ही मालिका सुरु करण्यात आली असुन दुचाकी वाहनाचा आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांक  शासनाने नेमुन दिलेली विहित फी भरुन प्राप्त करून घेता येईल.

आकर्षक क्रमांकाविषयी आवश्यक ती माहिती  परिवहन विभागाची वेबसाईट https://parivahan.gov.in/fancy या पोर्टल वर असून यावर पसंतीचा क्रमांक ऑनलाईन पध्दतीने आरक्षित करता येईल. तसेच सदर क्रमांकाकरिता ऑनलाईन रक्कम अदा करता येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.