छत्रपती शिवाजी महाराज पुण्‍यवंत, नितिवंत, जाणता राजा – आ. सुधीर मुनगंटीवार #छत्रपतिशिवाजीमहाराज #जाणताराजा #सुधीरमुनगंटीवार


छत्रपती शिवाजी महाराज पुण्‍यवंत, नितिवंत, जाणता राजा – आ. सुधीर मुनगंटीवार
 
चंद्रपुर : हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍त चंद्रपूरातील पटेल हायस्‍कुल समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी बाणा या संस्‍थेतर्फे आयोजित कार्यक्रमात विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपतींच्‍या प्रतीमेला माल्‍यार्पण करत आदरांजली अर्पण केली. पुण्‍यवंत, नितिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आपला मानबिंदु आहेत. महाराजांचे शौर्य, त्‍यांचा प्रताप, त्‍यांचा बाणा, त्‍यांची शिकवण अंगिकारणे हीच त्‍यांना खरी आदरांजली ठरेल असे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. 
यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, मनपा स्‍थायी समितीचे सभापती रवी आसवानी, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, अरुण तिखे, मराठी बाणा संस्‍थेचे रामजी हरणे, पिंटू धिरडे, हर्षद कानमपल्‍लीवार, अभिलाष कुंभारे, ऋषिकेश महाडोळे, अनिकेत नक्षिणे, रिंकू कुमरे, प्रथम तपासे, भुषण पोरते आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.