हिन्दु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन , या माध्यमांद्वारे थेट प्रसारण #BalasahebThakre #RashtriyaSmarak

हिन्दु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

या माध्यमांद्वारे थेट प्रसारण 

मुंबई, दि. 30 मार्च  : माननीय हिन्दू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते उद्या, दि. 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार असून या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे  स्मारक महापौर निवास,  शिवतीर्थ,  वीर सावरकर मार्ग,  दादर येथे उभारले जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण
 https://twitter.com/MMRDAOfficial अथवा   www.parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR आणि  https://www.facebook.com/MahaDGIPR  तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्विटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे.