महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण #MinisterAdityaThakre #Covid-19Positive

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे . आदित्य यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
“माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत .