MPSC EXAM UPDATE :महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेची सुधारीत तारीख जाहीर #Maharashtra। #MPSCEXAM

MPSC EXAM UPDATE  : राज्य सेवा पूर्व परीक्षेची सुधारीत तारीख जाहीर

मुंबई , 12 मार्च:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आता हे विद्यार्थी सरकारचा 21 मार्च रोजीचा निर्णय स्वीकारणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.