राजुरा विधानसभा क्षेत्रात 19 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू #RajuraVidhasabhaJantaCurfew


चंद्रपुर/राजुरा ,18 अप्रैल : कोरोना संक्रमणाचा चढता आलेख थोपविण्यासाठी आणि जनतेला संक्रमणमुक्त ठेवण्यासाठी जनतेचा सहभाग अत्यावश्यक असुन त्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे तसेच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे ह्यासाठी संपुर्ण राज्यात निर्बंध लागु करण्यात आले असले तरीही कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे जनतेसह व्यापाऱ्यांनी शासन प्रशासनास सहकार्य करावे आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्व व्यापारपेठ पुढील एक आठवडा पुर्णपणे बंद करण्यात यावी असे आवाहन आमदार सुभाष धोटे ह्यांनी केले आहे. 

आज दिनांक 18 अप्रैल 2021 रोजी उपविभागीय कार्यालय राजुरा येथे राजुरा, कोरपना, गडचांदूर येथील व्यापारी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. ह्या बैठकीस आमदार सुभाष धोटे ह्यांनी व्यापारी मंडळाचे सदस्य, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नगरसेवक, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, पोलीस अधिकारी ह्यांची उपस्थिती होती. 

ह्या बैठकीत कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी जनता कर्फ्यू हाच पर्याय असुन आपल्याला आपल्यासह इतरांचे प्राण वाचवायचे असेल आणि भविष्यात येणार्‍या अडचणी टाळायच्या असतिल तर सर्वांनी कठोरपणे नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे सर्व व्यापारी बांधवांनी 1 आठवडाभर जनता कर्फ्यू पाळून सहकार्य करावे ह्या आमदार सुभाष धोटे ह्यांच्या आवाहनाला सर्व व्यापारी मंडळांनी उस्फूर्त पाठींबा दिला असुन समाजाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी पुढील एक आठवडा कडकडीत बंद पाळण्याचे घोषित केले आहे. 
महाराष्ट्र राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात व राजूरा विधानसभा क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे, आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असुन वैद्यकीय सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे.

 वाढती रुग्णसंख्या त्याचबरोबर वाढते मृत्यु चिंतेची बाब झाली असुन ह्यातून मार्ग काढण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार करून चर्चेअंती राजुरा विधानसभा क्षेत्रात सोमवार दिनांक 19 एप्रिल ते 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कठोरपणे जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे. 

पुढील संपुर्ण आठवडाभर क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद राहील, फळे, भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात येणार आहे, हातगाडीवर घरोघरी होणारी भाजी विक्री पुर्णपणे बंद राहणार आहे तर दूध विक्री सकाळी 6 ते 9 ह्या काळातच केल्या जाईल मात्र दवाखाने, औषधी दुकाने मात्र नियमित वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. 

या बैठकीला उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्य्क्ष सुनील देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, राजुरा तहसिलदार हरीश गाडे, कोरपना तहसिलदार महेंद्र वाकलेकर, राजुरा  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाल भारती, कोरपना पोलीस स्टेशन चे  पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव,  मुख्यधिकारी आर्शिया जुही, विशाखा शेळकी कोरपना नगर पंचायतीचे  मयूर कांबळे,  नगर सेवक रमेश नळे, राजु डोहे, राजुरा व्यापारी अशोसीएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र देशकर, गोपाल झंवर, सतीश धोटे, गणेश रेकलवार, अश्विन पटेल, राजू बंदाली, खालिद भाई, बंडू कल्लूरवार इत्यादी व्यापारी बांधव उपस्थित होते.