गडचिरोली जिल्ह्यात मागील 24 तासात15 मृत्यूसह ,615 नवीन कोरोना बाधित, 287 कोरोनामुक्त Gadchiroli Corona


गडचिरोली जिल्ह्यात मागील 24 तासात

15 मृत्यूसह

615 नवीन कोरोना बाधित 

287 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.20 अप्रैल : आज जिल्हयात 615 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 287 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

 यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 15929 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12242 वर पोहचली. तसेच सद्या 3447 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 240 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

 आज 15 नवीन मृत्यू 
55 वर्षीय पुरुष अहेरी,  
65 वर्षीय महिला नवेगाव ,गडचिरोली,  
72 वर्षीय पुरुष माडगांव ता. लाखांदूर जि. भंडारा, 82 वर्षीय पुरुष चामोर्शी, 
44 वर्षीय महिला आरमोरी, 
52 वर्षीय पुरुष गडचिरोली, 
45 वर्षीय पुरुष माडेतुकूम, गडचिरोली, 
70 वर्षीय पुरुष घोट,ता. चामोर्शी,  
69 वर्षीय पुरुष चामोर्शी, 
53 वर्षीय पुरुष उमरेड, जि.नागपूर, 
49 वर्षीय पुरुष गडचिरोली , 
52 वर्षीय पुरुष  आरमोरी , 
71 वर्षीय पुरुष अर्जूनी मोरगाव,जि.गोंदिया , 
60 वर्षीय महिला गडचिरोली, 
45 वर्षीय पुरुष नागपूर 
यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. 

यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.85 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.64 टक्के तर मृत्यू दर 1.51 टक्के झाला.

      आज नवीन 615 बाधितांमध्ये 
गडचिरोली तालुक्यातील 185, 
अहेरी तालुक्यातील 46, 
आरमोरी 40, 
भामरागड तालुक्यातील 30, 
चामोर्शी तालुक्यातील 64, 
धानोरा तालुक्यातील 28, 
एटापल्ली तालुक्यातील 50, 
कोरची तालुक्यातील 30, 
कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 34 , 
मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 42, 
सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 06 
तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 60 जणांचा समावेश आहे. 

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 287 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 109, अहेरी 40,  आरमोरी 19, भामरागड 12, चामोर्शी 17, धानोरा 14 , एटापल्ली 06, मुलचेरा 07, सिरोंचा 03, कोरची 28, कुरखेडा 15, तसेच वडसा येथील 17  जणांचा समावेश आहे.