मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,गरजु आणि वंचितांना आर्थिक मदत, बघा कुणाला किती पैसा मिळणार? #FinancialPackageMaharashtraLockdown


मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,

गरजु आणि वंचितांना आर्थिक मदत,

 बघा कुणाला किती पैसा मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गरजु आणि वंचितांना आर्थिक मदत करण्याची मोठी घोषणा केली. या घोषणांचा हा आढावा 

1.महाराष्ट्र राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.

2. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना अशा पाच योजनेतील लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे.

3. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना 1500 रुपये देणार आहोत.

4. नोंदणीकृत घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणार.

5. अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 5 लाख आहे.

6. रिक्षा चालकांना 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 15 लाख आहे.

7. आदिवासी समाजातील खावटी योजनेच्या लाभार्थी आदिवासी कुटुंबाना प्रत्येकी 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे.

8. कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 3300 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.

9. हे सगळ करण्यासाठी 5 हजार 400 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवत आहे.