नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ , कोरोना रुग्णाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक #NagpurCoronaUpdateToday

नागपूर जिल्ह्यात  आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ  

कोरोना रुग्णाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक 

नागपूर :महाराष्ट्र राज्यात करोनोचा प्रादुर्भात दिवसेंदिवस वाढतोय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. नागपुरात तर आज आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी गरोदर मातांना कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यांच्यासाठी आता नागपुरात ओपीडी सुरु करण्यात आली आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशावेळी खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर उपाय म्हणून शहरातील काही डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केलीय. शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांनी कोरोनाबाधित गरोदर महिलांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केली आहे.

एखादा व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्यावर नेमकं काय करायचं असा प्रश्न त्याला पडतो. ज्यांना प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाणं शक्य नाही. त्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑनलाईन ओपीडीचा चांगला फायदा होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात याबाबत जनजागृती करत असल्याचं सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगितलं.

गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 868 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 42 हजार 933 वर जाऊन पोहोचली आहे.