चिंताजनक बातमी: आज नागपुरात दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंद #NagpurCoronaUpdateToday

चिंताजनक बातमी: आज नागपुरात दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंद

नागपूर,16 अप्रैल : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरातील रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. नागपुरातील मृत्यूदर दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललाय. नागपुरात आज दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

नागपुरात गेल्या 24 तासांत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 6 हजार 194 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.नागपुरातील मृत्यूच्या संख्येनं आता 6 हजारांचा आकडा पार केलाय. नागपुरातील एकूण मृतांची संख्या 6 हजार 109
वर जाऊन पोहोचली आहे.