17 मृत्यू
574 नवीन कोरोना बाधित
400 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका) दि.01मई: आज जिल्हयात 574 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 400 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 21751 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 16623 वर पोहचली. तसेच सद्या 4711 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 417 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
आज 17 नवीन मृत्यूमध्ये
ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला,
गडचिरोली येथील 32 वर्षीय पुरुष,
ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष,
ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष,
ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 20 वर्षीय महिला,
गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष,
ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला,
ता. वडसा जि. गडचिरोली येथील 64 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष,
ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला,
ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष,
ता. सावली जि. चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष,
ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला,
यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.66 टक्के तर मृत्यू दर 1.92 टक्के झाला.
नवीन 574 बाधितांमध्ये
गडचिरोली तालुक्यातील 184,
अहेरी तालुक्यातील 47,
आरमोरी 55,
भामरागड तालुक्यातील 08,
चामोर्शी तालुक्यातील 40,
धानोरा तालुक्यातील 23,
एटापल्ली तालुक्यातील 31,
कोरची तालुक्यातील 23,
कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 30,
मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 30,
सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 27
वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 76 जणांचा समावेश आहे.
तर आज कोरोनामुक्त झालेल्या 400 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 176, अहेरी 38, आरमोरी 25, भामरागड 10, चामोर्शी 14, धानोरा 23 , एटापल्ली 20, मुलचेरा 12, सिरोंचा 9, कोरची 27, कुरखेडा 9, तसेच वडसा येथील 37 जणांचा समावेश आहे.