अशोक तुमराम यांचे उपोषण मागे
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोक तुमराम यांचे १५ जूनपासून सुरु असलेले उपोषण महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लिंबू सरबत देऊन सोडविले.
जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता रेल्वेस्थानक परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शासकीय जागा विनामुल्य महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन देण्याबाबत माजी मंत्री, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले. जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांच्या वेळोवेळी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचित केले होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सकारात्मक पुढाकार घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या दिनांक २३/०६/२०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे ठराव क्र. ०९ अन्वये शासकीय जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्याचा ठराव पारित केला. जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी मागणीसाठी सुरु असलेले उपोषण सुरु होते. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला. उपोषण मागे घेतेवेळी यावेळी भाजपचे शहराध्यक्ष, डॉ. मंगेश गुलवाडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री देवराव भोंगळे, उपमहापौर श्री राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंद्रकला सोयाम, नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेविका माया उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, नामदेव डाहुले, व धनराज कोवे उपस्थित होते.