महाराष्ट्रातील दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, पण फायदा कुणाला?; आज संध्याकाळी जीआर, वाचा सविस्तर बातमी Lockdown Update Today

➡️ दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, 

➡️ पण फायदा कुणाला?; 

➡️ आज संध्याकाळी जीआर

➡️ वाचा सविस्तर बातमी

#Loktantrakiawaaz
#LockdownUpdateNews
सांगली, 02 अगस्त : महाराष्ट्र राज्यातील दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने (4 Hours) वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याबाबतचा जीआर (GR) आज काढण्यात येणार आहे. मात्र, ज्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू आहेत. दुपारी 4 पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.

👉🏻 आज संध्याकाळी जीआर निघनार
महाराष्ट्र राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.