चंद्रपूर व्यापारी मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा #ChandrapurVyapariMandal

चंद्रपूर व्यापारी मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

#Loktantrakiawaaz
#IndepandanceDayNews

चंद्रपुर, 15 ऑगस्ट : आज चंद्रपूर व्यापारी मंडळा (Chandrapur Vyapari Mandal) तर्फे 75 वा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम टिळक मैदान स्थित कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. ठीक सकाळी 8.00 वाजता नियोजित वेळी सदस्यांच्या भव्य उपस्थितीत आजचा झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. यंदाच्या वर्षी नव्यानेच स्थापन झालेल्या FTCI ह्या संस्थेच्या सर्व सदस्यांना देखील ह्या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. FTCI च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामकिशोर  सारडा आणि सचिव अनिल टहलियानी ह्या कार्यक्रमास उपस्थिती होते. मागील वर्षीच्या करोना च्या भीतीदायक परिस्थिती नंतर आज प्रथमच इतका मोठा कार्यक्रम झाल्यामुळे 200 च्या वर सदस्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झेंडावदन मंडळाचे अध्यक्ष ह्यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे सहसचिव श्रीकांत ताटपल्लिवार ह्यांच्या मार्गदर्शनात झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हटले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रभाकर मंत्री ह्यांनी दिले.  आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये  रामजीवन परमार ह्यांनी करोना काळामध्ये चंद्रपूर व्यापारी मंडळाने महानगरपलिकेच्या मदतीने जो RTPCR टेस्ट कॅम्प आयोजित केला त्याची माहिती दिली व तसेच FTCI च्या मदतीने जो वैक्सीनशन (Vaccination Camp) कॅम्प आयोजित केला त्याबद्दल माहिती दिली. मंडळाच्या ह्या कॅम्पमध्ये आतापर्यंत अंदाजे 4500 व्यापारी व गरजू लोक लाभांवित झाले ही माहिती त्यांनी उपस्थितीताना दिली व असेच लोकोपयोगी कार्य मंडळातर्फे ह्या पुढेही आयोजित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ज्या ज्या व्यापाऱ्यांनी मंडळाच्या ह्या कार्या मध्ये सहकार्य केले त्यांचे आभार त्यांनी मानले. त्यानंतर मंडळाचे सचिव प्रभाकर मंत्री ह्यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली. अशी माहिती संस्थेचे सदस्य सागर चिंतावार ह्यांनी दिली.