✳️ विसर्जित मुर्तींमधे एकही पीओपी मुर्ती नाही,
✳️ गणेशभक्तांसाठी मनपातर्फे कृत्रिम विसर्जन कुंड,
✳️ फिरते वाहन व्यवस्था
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, ता. १२ सेप्टेंबर : गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत शहराच्या सर्व भागात १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात आणि शांततेत बाप्पाचे आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळपर्यंत दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात सुमारे सोळाशे मूर्तीचे विसर्जन पार पडले.यात एकही पीओपी मुर्ती आढळुन आली नाही.
चंद्रपूर मनपाच्या वतीने यंदा पूर्णतः पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. झोन क्रमांक १ मध्ये मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट नागपूर रोड, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका, दाताळा रोड, इरई नदी, तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर), झोन क्रमांक - २ मध्ये गांधी चौक, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा पठाणपुरा रोड, समाधी वार्ड, शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड, विठोबा खिडकी, विठ्ठल मंदीर वार्ड, रामाळा तलाव, हनुमान खिडकी, महाकाली प्रा. शाळा, महाकाली वार्ड, झोन क्रमांक - ३ मध्ये नटराज टाॅकीज (ताडोबा रोड), सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ, मनपा झोन कार्यालय, मूल रोड, बंगाली कॅम्प चौक आदी ठिकाणी कृत्रिम विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत एकूण ८७ मूर्तींचे विसर्जन झाले, तर १२ सप्टेंबर रोजी एकूण १५१९ मूर्ती विसर्जित झाल्या. पहिल्या दीड दिवसांच्या एकूण १६०६ मूर्ती विसर्जित झाल्या.
झोन क्र. १(ब) अंतर्गत शनिवारी रात्री १२-०० पर्यंत तुकूम शाळा ८७, शिवसाई मंदिर येथे ११ मूर्ती विसर्जन झाले. झोन क्र. १(अ) अंतर्गत संजय गांधी मार्केट १२७, कलेक्टर बंगला २५, दाताळा रोड २०८ मूर्ती विसर्जन झाले. झोन क्र. ३(अ) मध्ये झोन क्र.३ कार्यालय परिसर विसर्जन कुंड येथे ३२ मूर्तीचे विसर्जन, एस.टी. वर्क्सशॉप १६४ मूर्तीचे विसर्जन झाले. शहराच्या इतर भागातही मूर्तीचे पर्यावरणपूरक रित्या विसर्जन पार पडले. याशिवाय शहरात झोननिहाय फिरते विसर्जन कुंड व्यवस्था करण्यात आली असून, सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत उपलब्ध राहील.
विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत ''फिरते विसर्जन कुंड''
फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल.
◆संपर्क क्रमांक◆
● झोन १ - ९८८१५९०४०२,
● झोन २- ९६६५४०३९९४,
● झोन ३ - ९६०७८४८६४८