महाराष्ट्र राज्यातील शाळा 01 डिसेंबरपासून सुरु, शासनाची नवी नियमावली जारी Maharashtra School Reopen

महाराष्ट्र राज्यातील शाळा 01 डिसेंबरपासून सुरु,

शासनाची नवी नियमावली जारी

#Loktantrakiawaaz
मुंबई, 29 नवंबर : महाराष्ट्र राज्यात सर्व शाळा (Maharashtra School Reopen) येत्या 1 डिसेंबपासून सुरु होणार (01 December) होत्या. मात्र ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या रुपामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या नव्या विषाणूचा संसर्गदर बघता शाळा सुरु होण्याची तारीख लांबवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून (Maharashtra Government) घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता या शाळा यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 1 डिसेंबपासूनच कुरु होतील हे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. या शासन निर्णयात शाळा सुरु कराताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय.

👉🏻  शाळा सुरु करण्यासाठीची नियमावली 
↔️  सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी (Zilla Parishad, Muncipal Corporation, Nagar Parishad, Education Officer) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन 100% लसीकरण (100% Vaccination) करण्यासाठी प्रयत्न करावेत.

↔️ विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

↔️ एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे या गोष्टींचे पालन करावे.

↔️ जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी.

↔️ शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य द्यावे. यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचनाचे (SOP)  पालन करावे. संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात किंवा गावात करावी.

↔️ विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी,  विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत. तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांचीसुद्धा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

↔️ 1 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.

↔️ 1 डिसेंबर 2021 पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. वरील मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचेदेखील पालन करण्यात यावे.

↔️ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.