चंद्रपूर: जिल्हा कोषागार खात्यातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सुरेश उर्फ विलास चांभारे यांचा गांगलवाडी (ता. मुल) येथील नागरीकांनी सपत्नीक सत्कार करून उभय दांम्पत्यांच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. (District Treasury)
गांगलवाडी (Gangalwadi) येथील हनुमान मंदीरा समोर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंचा श्रीमती ताराबाई चांभारे होत्या. कार्यक्रमास ज्येष्ठ सेवानिवृत्त वनपरीक्षेत्रा अधिकारी श्रीहरी चांभारे, मनोहर नरडंगे, विजय नाट, कपील शेंडे, हरीदास नलंगे, शामराव चांभारे, गंगाधर चांभारे, प्रकाश चांभारे, येनीदास दाजगाये, संपतराव जेंगठे, सुरज खोडपे यांचेसह गावातील महिला व पुरूष प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री सुरेश चांभारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच साडीचोळी देवून मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी पुष्पगुच्छ व कुंकुम तिलक लावून सन्मान केला. याप्रसंगी प्रकाश चांभारे यांनी सुरेश चांभारे यांच्या 32 वर्षीय शासकीय सेवेबद्दल प्रशंसोद्गार काढुन त्याच्या कार्याचा गौरव केला. शासकीय सेवेत असतांना कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता त्यांनी शासनाची इमानेइतबारे सेवा केली. आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षण देवून त्यांनी आपले कर्तव्य निभावले अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांचा गावकऱ्यांनी सन्मान केला ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे सांगीतले. यावेळी 15 वर्ष सरपंच पद सांभाळुन गावाचा सर्वांगीन विकास केल्याबद्दल माजी सरपंचा श्रीमती ताराबाई चांभारे यांचाही साडीचोळी व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्वश्री मुकुंद खोडपे, वसंत चांभारे, नितेश नरडंगे, रेवनबाई नरडंगे, देवेंद्र चांभारे, नितेश चांभारे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन संजय शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन नितेश नरडंगे यांनी केले.