10वी (SSC) आणि 12वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास विलंब शुल्क माफी #10thAnd12thClasses #onlineApplicationForm for the #Examination #SCC #HSC

10वी (SSC) आणि 12वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास विलंब शुल्क माफी

मुंबई, 23 डिसम्बर : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी (Students) एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी 10वी (SSC), 12वी (HSC) च्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. ‘कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
(Without any delay charges etc.  Students of 10th and 12th classes are allowed to fill up online application form for the examination till the day before the commencement of written examination of the board.)
परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याची माहिती काही मान्यवर सदस्यांनी चर्चेदरम्यान पुरवली, असं गायकवाड यांनी सांगितलं.

राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आठ दिवसांपूर्वी दिली. 10वी, 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा गायकवाड यांनी जाहीर केल्या.