बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात खनिज विकास निधी अंतर्गत १ कोटी ९० लक्ष रूपये किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत Mineral Development Fund, Ballarpur Assembly constituency, MLA Sudhir Mungantiwar

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात खनिज विकास निधी अंतर्गत १ कोटी ९० लक्ष रूपये किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 30 मार्च: विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांच्‍या पुढाकाराने खनिज विकास निधी अंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात १ कोटी ९० लक्ष रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी मिळाली आहे. (Ballarpur assembly constituency).
जिल्‍हाधिकारी चंद्रपूर (chandrapur collector) यांच्‍या दिनांक ४ मार्च २०२२ च्‍या पत्रान्‍वये या विकासकामांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.

या मंजूर विकासकामांमध्‍ये मुल तालुक्‍यातील फिस्‍कुटी येथे वाचनालयाचे बांधकामासाठी ३० लक्ष रुपये, पिपरी दिक्षीत येथे वाचनालयाचे बांधकामासाठी ३० लक्ष रुपये, मारोडा येथे कन्‍नमवार चौक ते श्री. गजानन कोलप्‍याकवार यांच्‍या घरापर्यंत बंदिस्‍त नाली व सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकामासाठी १५ लक्ष रुपये, चंद्रपूर तालुक्‍यातील पायली येथील नदीम रायपुरे यांच्‍या घरापासून श्रावण कातकर यांच्‍या घरापर्यंत दोन्‍ही बाजूला पाईप बंदिस्‍त नालीचे बांधकाम करण्‍यासाठी १५ लक्ष रूपये, भटाळी येथील धनराज झाडे यांच्‍या घरापासून भोलेनाथ पवार यांच्‍या घरापर्यंत दोन्‍ही बाजूला पाईप बंदिस्‍त नालीचे बांधकामासाठी १५ लक्ष रुपये, भटाळी-पायली ते चिंचोली या व्‍हीडीआर रस्‍त्‍याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्‍यासाठी ६० लक्ष रूपये, पोंभुर्णा तालुक्‍यातील भिमणी येथील कार्तीक आडे ते मिराबाई आत्राम यांच्‍या घरापर्यंत दोन्‍ही बाजूने सिमेंट कॉंक्रीट नालीचे बांधकाम करण्‍यासाठी १० लक्ष रूपये, बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा येथील श्री. नंदू धोडरे यांच्‍या घरापासून गणपती दुधबळे यांच्‍या शेतापर्यंत पांदण रस्‍त्‍याचे खडीकरण करण्‍यासाठी १५ लक्ष रूपये, असे एकूण १ कोटी ९० लक्ष रूपये किंमतीची विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.

या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन अनेक विकासकामे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्‍यात आली आहे.

Approval for development works worth Rs. 1 crore 90 lakhs under Mineral Development Fund in Ballarpur Assembly constituency  result of the efforts of mla Sudhir Mungantiwar

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in क्लिक करा.