भेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा - मंत्री संजय राठोड, अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा Take strict action against adulterers - Review by Minister Sanjay Rathore, Department of Food and Drug Administration


▪️भेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा - मंत्री संजय राठोड

▪️ अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात काही उद्योजक तसेच विक्रेते अन्नधान्यांमध्ये भेसळ करून आपला माल विकत असतात. भेसळ करणाऱ्या व्यक्तीची माहिती होताच त्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकून कडक कारवाई करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. 

शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त (औषधे) उमाकांत बागमारे, औषध निरीक्षक सी. के. डांगे, अन्नसुरक्षा अधिकारी प्रवीण उमप, प्रफुल टोपले, गिरीश सातकर आदी उपस्थित होते.

नवरात्र, दसरा, दिवाळी तसेच इतर सणांमध्ये तेल, दूध, मिठाई, भगर, रवा, आदींचा उपयोग गोड पदार्थ करण्यासाठी केला जातो, असे सांगून मंत्री श्री. राठोड म्हणाले की, दुकानांमधील तसेच उद्योजकांच्या कंपनीमध्ये खाद्यतेलांचे नमुने नियमितपणे तपासावे. भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. यात कितीही मोठा उद्योजक असला तरी हयगय करू नये. प्रसंगी यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. पुढील महिनाभर ही मोहीम अतिशय जोमाने तसेच त्यानंतरही नियमितपणे राबवा. यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे. 

➡️ खाद्य तेलामध्ये भेसळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिकांना एन्जोप्लास्टी, अँजिओग्राफी आदी रोगांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले पाहिजे. चंद्रपूर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, आदी उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये काम करणारा मजूर वर्ग हा गुटखा आणि खऱ्याच्या आहारी गेला असल्याचे निदर्शनास येते. गुटखा विकणाऱ्यांवर तसेच गुटख्याची निर्मिती होते त्या ठिकाणची माहिती घेऊन उद्योजकांवर धाडी टाका. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात खदानींमध्ये गुटखा सप्लाय करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करा. येत्या 15 दिवसांत या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

➡️ सन 2021- 22 मध्ये अन्नधान्याचे 251 नमुने घेण्यात आले. यापैकी प्रमाणित 176 नमुने, कमी दर्जा असलेले 8 नमुने, मिथ्याछाप 7, असुरक्षित 19 नमुने, तर 41 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 2022 - 23 मध्ये 169 नमुने घेण्यात आले असून यापैकी प्रमाणित 8, कमी दर्जा असलेली 0, मिथ्याछाप 2, असुरक्षित 0 आणि अहवाल प्रलंबित असलेल्या नमुन्यांची संख्या 159 आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी पाठपुरावा करून त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशा सूचनाही यांनी दिल्या. 

गत दोन वर्षात विभागाच्या वतीने एकूण 23 धाडी टाकण्यात आल्या. यात 32 लक्ष 88 हजार 277 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ बाबत 2021 - 22 मध्ये 10 प्रकरणात आठ गुन्हे नोंद, तर 2022 - 23 मध्ये आठ प्रकरणात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Chandrapur, Dt.  October 1: Currently there are festive days.  During this period, some entrepreneurs and sellers sell their goods by adulterating food grains.  Sanjay Rathod, State Minister for Food and Drug Administration and Guardian Minister of Yavatmal, has given instructions to take strict action against the adulterers as soon as they come to know about them.

 He was speaking while reviewing the Food and Drug Administration Department at the Government Rest House.  Assistant Commissioner (Food) Nitin Mohite, Assistant Commissioner (Drugs) Umakant Bagmare, Drug Inspector C.  K.  Dange, Food Safety Officer Praveen Ump, Praful Tople, Girish Satkar etc were present.

 Minister Shri.  Rathod said that samples of edible oils in shops as well as in the company of entrepreneurs should be checked regularly.  Strict action should be taken against those who play with the health of citizens by adulteration.  No matter how big an entrepreneur is, it should not be harmed.  Take the help of the police for this.  Carry out this campaign very vigorously for the next month and regularly thereafter.  For this, the department should plan properly.
 Citizens have to face diseases such as angioplasty, angiography, etc. due to high adulteration in edible oil.  Adulteration should be completely stopped in the district.  Since Chandrapur is an industrial city, there are large number of coal mines, cement companies, etc.  It can be seen that the working class working in these industries is fed up with gutkha and real.  Raid the gutkha sellers as well as the entrepreneurs with information about the place where the gutkha is produced.  In Chandrapur and Gadchiroli districts take action by taking information about those supplying Gutkha to quarries.  Minister Sanjay Rathod has given instructions that the report of this action should be submitted in the next 15 days.

In the year 2021-22, 251 samples of food grains were taken.  Out of these 176 certified samples, 8 substandard samples, 7 counterfeit, 19 unsafe samples, while report of 41 samples is pending.  169 samples were collected in 2022-23 out of which 8 were certified, 0 were substandard, 2 were counterfeit, 0 were unsafe and 159 were pending report.  He also gave instructions that the pending cases should be followed up and disposed of immediately.

 In the last two years, a total of 23 raids were conducted on behalf of the department.  In this, 32 lakh 88 thousand 277 rupees worth of stock was seized.  It was informed in the meeting that eight crimes were registered in 10 cases in 2021-22, while eight crimes were registered in eight cases in 2022-23.