'विकासाचा कल्पवृक्ष’ ऑडियो बुकची संकल्पना महत्वपूर्ण, उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयीच्या पुस्तकाच्या स्टोरी टेल आवृत्तीचे प्रकाशन The concept of Vikascha Kalpavriksha' audio book is important, useful – Chief Minister Eknath Shinde,

🔹 'विकासाचा कल्पवृक्ष’ ऑडियो बुकची संकल्पना महत्वपूर्ण, उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

🔹 मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयीच्या पुस्तकाच्या स्टोरी टेल आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई: स्टोरी टेलचे ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे ऑडियो बुक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यत पोहचवेल. त्यादृष्टीने ही ऑडियो बुकची संकल्पना निश्चितच महत्वाची आणि उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. 
'विकासाचा कल्पवृक्ष' या पुस्तकाच्या स्टोरीटेलने तयार केलेल्या ऑडियो बुक आवृत्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी वने तथा सांस्कृतिक कार्ये, मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्टोरी टेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ, मराठी विभागाचे प्रमुख प्रसाद मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्व असते, त्यांच्याच कार्याबाबत पुस्तक प्रकाशित होत असतात. मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्य कर्तृत्व पहात आलो आहे. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांची अर्थमंत्री म्हणून काम कऱण्याची पद्धतीही जवळून अनुभवली आहे. वनमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे काम केले आहे. कोट्यवधी वृक्ष लागवडीचे शिवधनुष्यही पेलले आहे. आता तर त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्ये मंत्रीपदही आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता वन आणि मन याविषयी काम करण्याची जबाबदारी आहे. त्यांची विधिमंडळ सभागृहातील भाषणे, विषय मांडण्याची हातोटी सर्वांनाच माहित आहे. ते मांडणी करताना अनेक दाखले, आकडेवारीची पोतडीच घेऊन येतात. मंत्रिमंडळ बैठकीतही ते परखडपणे बोलतात. राज्याच्या, लोकांच्या हिताच्या योजना, चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत, यासाठी त्यांची तळमळ असते. या ऑडियो बुकच्या माध्यमातून त्यांची ही तळमळ, त्यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यंत पोहचेल, असा विश्वास आहे.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राकडे सांस्कृतिक समृद्धी आहे. ती अशा ऑडियो बुकच्या माध्यमातून जगभर पोहचविता येईल. ऑडियो बुकचे हे माध्यम शक्तीशाली आहे. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आपला महाराष्ट्र धनसंपन्न होईलच. पण तो गुणसंपन्नही होईल. यासाठी या ऑडियो बुक संकल्पनेचा वापर करता येईल. 
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या कार्याविषयीचे ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे पुस्तक किरण कुलकर्णी यांनी लिहीले आहे. त्याच्या ऑडियो बुकसाठी कुणाल आळवे यांनी आवाज दिला आहे.

The concept of Vikascha Kalpavriksha' audio book is important, useful – Chief Minister Eknath Shinde

MUMBAI: Story Tale's 'Vikascha Kalpavriksha' audio book will bring the sensitive man in Minister Sudhir Mungantiwar to the masses.  In that regard, Chief Minister Eknath Shinde said here today that the concept of audio book is definitely important and useful.

Chief Minister Shri.  Published by Shinde.  On this occasion, Minister of Forests and Cultural Affairs, Fisheries Sudhir Mungantiwar, India Head of Story Tale Yogesh Dashrath, Head of Marathi Department Prasad Mirasdar and other dignitaries were present.

Chief Minister Mr.  Shinde said, books are published about the work of those who have achievements.  I have been watching Sudhir Mungantiwar's work as a minister.  He has handled many responsibilities efficiently.  His manner of working as Finance Minister has also been closely experienced.  He has also done great work as the Forest Minister.  Shivadhanushya of planting crores of trees has also been fulfilled.  Now he also holds the post of Minister of Cultural Affairs.  So they now have the responsibility to work on forest and mind.  Everyone knows his speeches in the legislative hall, his skill in presenting topics.  They come with many proofs and statistics while arranging.  Even in the cabinet meeting, he speaks sternly.  They have a longing for the plans of the state, people's welfare, good decisions should reach the people.  It is believed that through this audio book, this longing of his, the sensitive person in him will reach the people.

Minister Shri.  Mungantiwar said, Maharashtra has cultural richness.  It can be delivered all over the world through such an audio book.  This medium of audio books is powerful.  This activity is being implemented for this.  Our Maharashtra will become rich.  But it will also be successful.  This audio book concept can be used for this.