मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित शिक्षकांना नैमित्तिक रजा मंजूर Regarding exercise of right to vote Teachers are granted casual leave

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित
शिक्षकांना नैमित्तिक रजा मंजूर

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 12 जानेवारी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरीता सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील 27 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

त्याअनुषंगाने, निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित शिक्षक मतदार संघामध्ये मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य, यांचे शासन निर्णय दि. 23 जून 2011 अन्वये त्या दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त आहे. याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.

Regarding exercise of right to vote

Teachers are granted casual leave