पत्रकार महामंडळ स्थापण्यासाठी केंद्राच्या हालचाली? ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पुढाकारातून होणार कामाला सुरुवात, राज्यातल्या महामंडळाला शंभर कोटी देण्याची मागणी Center's move to set up journalists corporation? The work will be started through the initiative of 'Voice of Media', demand to pay one hundred crores to the corporation in the state

पत्रकार महामंडळ स्थापण्यासाठी केंद्राच्या हालचाली?   
 
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पुढाकारातून होणार कामाला सुरुवात
 
राज्यातल्या महामंडळाला शंभर कोटी देण्याची मागणी
 
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात प्रत्येक वंचित घटकांच्या मदतीसाठी असणाऱ्या महामंडळाप्रमाणे देशातल्या सर्व पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळा असावे अशी मागणी दिल्लीमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केंद्रीय शिष्टमंडळाने केली. भागवत कराड यांनी या प्रकरणी सकारात्मक संकेत दिले आहेत. देशातल्या प्रत्येक राज्यातल्या पत्रकार महामंडळाला दरवर्षी शंभर कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

‘कोविड’च्या काळापासून देशातील पत्रकार खूप अडचणीत आले आहेत. अनेकांची नोकरी गेली आहे. देशात कोविडच्या काळात अनेक पत्रकारांचे प्राण गेले आहेत. त्या प्राण गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आता मदतीची नितांत गरज आहे. मोठ्या शासकीय मदतीमधून सर्व राज्यांतील पत्रकारांना चांगले दिवस येऊ शकतील. त्यासाठी महामंडळाची आवश्यकता आहे. पत्रकारांचे आर्थिक सक्षमीकरण काळाची गरज होऊन बसले आहे. देशात केवळ एकवीस टक्के पत्रकार आपल्या कुटुंबाला जेमतेम आधार देऊ शकतात, अशी अवस्था आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयी सकारात्मक पावले उचलू, असे सांगितले; तर केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेटीदरम्यान सांगितले की, पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ हा विषय खूप महत्त्वाचा आहे. या विषयात अजून खोलवर जाऊन, संशोधनाचा आधार घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत मी पुढचे पाऊल टाकणार असल्याचे कराड म्हणाले.
 
खुद्द केंद्रीय अर्थमंत्री यांनी केवळ आश्वासन न देता काम मार्गी लावू, असे सांगितल्यामुळे आता महामंडळाच्या कामाला सुरुवात होईल. पत्रकारांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील, अशी आशा आता पल्लवित झाली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय  सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मार्गदर्शक संचालक ओमप्रकाश शेटे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्य सेलचे प्रमुख, भिमेश मुतुला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संचालक श्यामसुंदर माडेवार, यांचा या शिष्टमंडळामध्ये सहभाग होता.    

पत्रकारांच्या भवितव्यासाठी केंद्राने महामंडळाचा धाडसी निर्णय घ्यावा : संदीप काळे
सगळेच व्यवसाय करतात, मग पत्रकारांनी व्यवसाय केला तर भुवया उंचवण्याचे कारण काय, नोकरीचा भरोसा नाही. जेमतेम पगार, अशा परिस्थितीमध्ये सन्मानाने जगायचे कसे,  हा प्रश्न देशातील 85 टक्के पत्रकारांसमोर उभा आहे. पत्रकारांचे असलेले आयोग, पत्रकारांना जेमतेम जगण्यासाठी असलेल्या अनेक स्वरूपाच्या प्रलंबित मागण्या या जशाच्या तशा कित्येक वर्षांपासून खितपत पडल्या आहेत. त्या त्या राज्याच्या ठिकाणी, या कठीण परिस्थितीकडे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिथे सतत दुर्लक्ष होत गेले. अशा कठीण परिस्थितीमध्ये आता केंद्राने पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेच आहे. केंद्राने ठरवले तर महामंडळ सुरू करणे ही अवघड बाब नाही. त्यासाठी केवळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. महामंडळाचे स्वरूप कसे असावे, कशा पद्धतीने पत्रकार या महामंडळाच्या माध्यमातून उभा राहू शकतो. याचा पूर्ण आराखडा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने तयार केला आहे. सरकारने या आराखड्याच्या माध्यमातून पत्रकारांच्या दृष्टीने असलेल्या महामंडळाचा निर्णय घेऊन ऐतिहासिक भूमिका बजावावी, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
 
फ़ोटो: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मार्गदर्शक संचालक ओमप्रकाश शेटे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्य सेलचे प्रमुख भिमेश मुतुला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संचालक श्यामसुंदर माडेवार, यांचा समावेश होता. 

Center's move to set up journalists corporation?  

The work will be started through the initiative of 'Voice of Media', 

demand to pay one hundred crores to the corporation in the state

New Delhi (Representative): The central delegation of 'Voice of Media' in Delhi demanded that there should be a corporation for the overall development of all journalists in the country, like the corporation that exists to help every disadvantaged group in the country.  Bhagwat Karad has given positive indications in this matter.  Sandeep Kale, the founder and national president of 'Voice of Media', has demanded that Union Finance Minister Nirmala Sitharaman, Union Minister of State Bhagwat Karad should be given Rs.

Since the time of 'Covid', the journalists of the country have been in a lot of trouble.  Many have lost their jobs.  Many journalists have lost their lives during Kovid in the country.  The families of those journalists who lost their lives are now in dire need of help.  Journalists in all states can see better days with big government help.  A corporation is required for that.  Financial empowerment of journalists is the need of the hour.  In the country, only twenty one percent journalists can barely support their families.  Union Finance Minister Nirmala Sitharaman said that we will take positive steps in this regard;  While the Union Minister of State Bhagwat Karad said during the visit that the issue of corporation is very important for the overall development of journalists.  Karad said that he will take the next step in this matter by going deeper into it and by taking the basis of research.

The work of the corporation will now begin as the Union Finance Minister himself has said that he will get the work done without just giving assurances.  Now there is hope that better days will come in the life of journalists.  Sandeep Kale, Founder and National President of 'Voice of Media', National General Secretary Chandramohan Puppala, National Vice President Dharmendra Jore, Guiding Director of 'Voice of Media' Omprakash Shete, Head of Health Cell of 'Voice of Media', Bhimesh Mutula, 'Voice of Media'  Shyamsunder Madewar, Director of Media, participated in this delegation.

Center should take bold decision of corporation for future of journalists: Sandeep Kale
Everyone does business, then what is the reason to raise eyebrows if journalists do business, there is no job security.  Barely paid, how to live with dignity in such a situation, this question is facing 85 percent of journalists in the country.  The Commission of Journalists, the pending demands of many forms of barely surviving journalists have been languishing for years.  In those states, attempts have been made to draw attention to this dire situation, but it has continued to be ignored.  In such a difficult situation, it is necessary for the Center to pay attention to the issue of journalists.  Starting a corporation is not a difficult matter if the center decides.  Only willpower is important for that.  What should be the nature of the corporation, how a journalist can stand through this corporation.  The complete plan has been prepared by 'Voice of Media'.  Sandeep Kale, the founder and national president of 'Voice of Media', has demanded that the government should play a historic role by taking a decision on a corporation for journalists through this plan.

Photo: Central delegation meets Union Minister of State Bhagwat Karad.  The delegation included Founder and National President of 'Voice of Media' Sandeep Kale, National General Secretary Chandramohan Puppala, National Vice President Dharmendra Jore, Guiding Director of 'Voice of Media' Omprakash Shete, Head of Health Cell of 'Voice of Media' Bhimesh Mutula, 'Voice of Media'  Director of Media Shyamsunder Madewar, was included.

#Voice Of Media
#Sandip Kale
#Union Minister of State Bhagwat Kara