वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची नवीन कार्यकारिणी गठित, अध्यक्षपदी राजेंद्र मर्दाने, सचिवपदी जितेंद्र चोरडिया Varora - Bhadravati - Chandrapur Railway Passenger Union Constituted New Executive Committee Rajendra Mardane as President, Jitendra Chordia as Secretary

वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची नवीन कार्यकारिणी गठित
 
⭕अध्यक्षपदी राजेंद्र मर्दाने, सचिवपदी जितेंद्र चोरडिया

वरोरा :  सन  २००७ मध्ये स्थापित वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची २०२३ - २०२५ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी समाज कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने तर सचिवपदी प्रसिद्ध व्यावसायिक तथा पत्रकार जितेंद्र चोरडिया यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
   
 संस्थापक राजेंद्र मर्दाने याच्या नेतृत्वात मागील १५  वर्षांपासून जिल्ह्यात रेल्वे प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडून यथोचित मार्गाने समस्या निवारण करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोना संक्रमणानंतर लॉक डाऊन काळात रेल्वे विभागाने घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका रेल्वे प्रवाश्यांना बसत आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील जनतेला रेल्वेचा अधिकाधिक लाभ मिळावा, रेल्वे स्थानकावर गाडी थांब्यासह अन्य सुविधाही उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रवासी संघ कार्य करीत आहे. 

        सेवानिवृत्त प्राचार्य बी. आर. शेलवटकर यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डा परिसरात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नुतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष राजेंद्र मर्दाने, उपाध्यक्ष प्रवीण कडू /श्री प्रवीण गंधारे, सचिव जितेंद्र चोरडिया, सहसचिव अशोक बावणे, कोषाध्यक्ष योगेश खिरटकर, संघटक राहुल देवडे, प्रसिद्धी प्रमुख  बबलू रॉय, कार्यकारिणी सदस्य रितेश भोयर, शरद नन्नावरे, विजय वैद्य, सुधीर खापणे, मयूर दसुडे,  हितेंद्र तेलंग, श्याम अवसरमोल, कॅरन्स रामपुरे, पुरुषोत्तम केशवाणी,  बंडू देऊळकर, राजेश ताजने,  प्रवीण सुराणा, जगदीश तोटावार, साईनाथ कुचनकार, शाहिद अख्तर, संजय गांधी, विलास दारापुरकर, सुरेंद्र चौहान, जुबेर कुरेशी, श्याम ठेंगडी, दत्तश्री ठाकरे, खेमचंद नेरकर, आलेख रट्टे, तुषार मर्दाने,अधिवक्ता राजु लोखंडे, डॉ. प्रवीण मुधोळकर, अभियंता रवि चौहान, ओंकेश्वर टिपले आदींचा समावेश आहे.

Varora - Bhadravati - Chandrapur Railway Passenger Union Constituted New Executive Committee

 Rajendra Mardane as President, Jitendra Chordia as Secretary