पक्षविचारधारे प्रमाणे काम करून पदाला न्याय देणार : रामू तिवारी Will do justice to the post by working according to party ideology: Ramu Tiwari

पक्षविचारधारे प्रमाणे काम करून पदाला न्याय देणार : रामू तिवारी

खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे प्रभारी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांना  शुभेच्छा

चंद्रपूर : देशात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी तसेच हुकूमशाही मोदी सरकार विरोधात देशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजारो किलोमीटर पायदळ फिरत भारत जोडोचा  नारा दिला. मात्र, चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून भाजप अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासोबत डान्स केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खालावले. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रक काढून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची पदावरून हकालपट्टी केली. त्यांचा पदभार शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला. पक्षविचारधारे प्रमाणे काम करून पदाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे प्रभारी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केले. 

चंद्रपूर येथील  जनसंपर्क कार्यालय येथे  खासदार बाळू धानोरकर यांनी रामू तिवारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना  शुभेच्छा दिल्या.   

यावेळी माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, साबीर सिद्दीकी, संजय गंपावार, कुणाल चहारे, काशिफ अली, रमीझ शेख, राजीव खजांची यांची उपस्थिती होती.
Will do justice to the post by working according to party ideology: Ramu Tiwari