17 ऑगस्टपासून ताडोबा सफारी बुकींगकरीता नवीन संकेतस्थळ होणार सुरू A new website for booking Tadoba Safaris will be launched from August 17

17 ऑगस्टपासून ताडोबा सफारी बुकींगकरीता नवीन संकेतस्थळ होणार सुरू

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकींगकरीता सध्या सुरू असलेल्या www.mytadoba.org, https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असून सदर पोर्टलवरून कोणत्याही व्यक्ती/संस्थेकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या हेतुने केली जाणारी बुकींग वैध राहणार नाही.

दि. 17 ऑगस्टपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीकरीता एकवेक अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in हे असेल. यापुढे जंगल सफारीचे बुकींग केवळ www.mytadoba.mahaforest.gov.in याच पोर्टलवरून करण्यात यावे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कार्यकारी संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.

#A-new-website  #booking-Tadoba-Safaris  #launched  #August 17
#Tadoba  #Chandrapur