सार्वजनिक गणेश मंडळाकडुन 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज आमंत्रित, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाकडून पुरस्कार Online applications are invited from Public Ganesha Mandals before September 5, the best Ganeshotsav Mandals will get awards from the government

Ø सार्वजनिक गणेश मंडळाकडुन 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाकडून पुरस्कार

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर,दि. 01 अगस्त : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्र.पुलदे-2023/ प्र.क्र.1/सां.का.2, दि. 4 जुलै 2023 अन्वये, दि. 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या 10 निकषांची पूर्तता करणाऱ्या, व करू शकणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com  या ई-मेलवर दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयात उपलब्ध असून सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे नायब तहसिलदार (सामान्य) गिता उत्तरवार यांनी कळविले आहे.

Online applications are invited from Public Ganesha Mandals before September 5, the best Ganeshotsav Mandals will get awards from the government 
#Ganeshotsav #Maharashtra
#Public-Ganesha-Mandals
#Chandrapur #Ganpati  #Ganesh